Breaking News

केएलई सोसायटीची नेरूळमध्ये नवीन शाळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा

नवी मुंबई : बातमीदार

के. एल. ई सोसायटीच्या नवीन शाळेचा पायाभरणी समारंभ प्रमुख बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते नुकताच नेरूळ येथे झाला.

या वेळी के.एल.ई सोसायटीचे प्रेसिडेंट व बेळगाव कर्नाटकचे आमदार महंतेश कौजलगी, अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार तसेच सोसायटीच्या संचालक मंडळाचे इतर सभासददेखील उपस्थित होते. के. एल. ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते आमदार मंदा म्हात्रे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीतर्फे के.एल.ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व इतर मान्यवर सभासदांचा सत्कार करण्यात आला.

नवी मुंबई शहर हे एक मिनी भारत म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक राज्यांचे नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक राज्यांची भवने, अनेक राज्यांच्या संस्थांच्या शाळा नवी मुंबईत आहेत. के.एल.ई संस्थेची नेरुळ येथील ही शाळा येणार्‍या काळात नवी मुंबई शहरातील उच्च दर्जाचे शिक्षण देणारी एक प्रमुख स्त्रोत ठरेल अशी इच्छा या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त करून शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply