संचारबंदी झुगारून लोक रस्त्यावर
अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र या संचारबंदीतही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोक निरनिराळ्या कारणांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरुवारी (दि. 15) सकाळी पहायला मिळाले.
अलिबागमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पनवेलनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या अलिबागमध्ये आहे. जिल्हा रुग्णालयात खाटा अपुर्या पडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदी लागू झाली. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे निर्देश नागरिकांना देण्यात आले, मात्र तरीही घराबाहेर पडणार्यांची संख्या कमी नव्हती. भाजीबाजार, फुलबाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस गाड्या थांबवून लोकांना घरी परतण्याचे आवाहन करीत होते, मात्र निरनिराळ्या सबबी सांगून त्यांच्या सूचनाकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत होते.
अखेर पोलिसांनी गाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू केली. एकूणच पहिल्याच दिवशी संचारबंदीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.