Breaking News

रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्यावरील अतिक्रमणे उद्ध्वस्त

रेवदंडा : प्रतिनिधी

रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्‍यावर शासकीय जागेत  अतिक्रमण करून उभारलेली कॅम्पेंज महसुल विभागाने जेसीपीच्या सहाय्याने उध्वस्त केली. या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी शासकीय जागेत अतिक्रमण करून कॅम्पींग मार्फत पर्यटकांसाठी टेन्ट सुविधा केली होती. त्यात अनधिकृतपणे संडास, बाथरूम, चेजींग रूम बांधण्यात आले होते. तसेच येथे  बेकायदेशीर पार्ट्या होत असल्याचा आरोप परिसरातील  ग्रामस्थांनी केला होता.

अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी उभारलेल्या कॅम्पींगमधील बांधलेले संडास, बाथरूम, चेजींग रूम जेसीपीच्या सहाय्याने तोडण्यात आले.  कॅॅम्पींगसाठी उभारलेल्या झोपड्या, तसेच विविध सजावट सुध्दा या कारवाईत उध्वस्त करण्यात आली.

या ठिकाणी असलेल्या एकूण 58कॅम्पींग व्यावसायीकांवर कारवाई केली जाणार असल्याचे  तहसिलदार सचिन शेजाळ यांनी या वेळी सांगितले. या कारवाईने कॅम्पींग मार्फत टेन्ट सुविधा पुरविणार्‍या  व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक ग्रामस्थांनी  या कारवाईचे स्वागत केले आहे.

अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईच्यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक अशोक थोरात यांनी मोठा बदोबस्त तैनात केला होता. सीआरपी पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply