कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील ज्ञानमंदिर विद्यालय येथे शनिवारी (दि. 12) नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नगरसेवक अमर पाटील यांनी येथील जनतेची सेवा करताना अनेक विकासाची, जनहिताची कामे केली आहेत. याचीच पावती म्हणून आज हा मोठा समुदाय उसळला आहे. मोदीजींनी अनेक योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचविल्या. त्यामुळे जनतेने मोदीजी व भाजपवर विश्वास टाकत पाच राज्याच्या निवडणुकीत चार राज्यात भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. आणि तेच सातत्य राखीत आम्ही जनतेची सेवा करत राहू, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांसाठी खेळ पैठणीचा या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी भाग घेतला होता. विजेत्या महिलांना आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, सभापती प्रमिला पाटील, नगरसेविका मोनिका महानगर, नगरसेवक बबन मुकादम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रिया मुकादम, बबन बारगजे, विलास कुठे, संदीप भगत, अमर ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल उपाध्यक्ष प्रियंका पवार, कळंबोली महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा सरचिटणीस दुर्गा सहानी, उमा राव, कविता गुज्जर, मयूरी पेरवी, श्वेता नगराले, नीता अधिकारी, सरिता बसोने, आश अल्लाह, सुलभा साखरे ,पुष्पा पंचाक्षरी यांनी परिश्रम घेतले.