Breaking News

काँग्रेसला 17 राज्यांत फक्त भोपळाच

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त 86, तर अन्य पक्षांना 106 जागा मिळाल्या आहेत. सलग दुसर्‍या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यंदा हा पक्ष 52 जागांवर जिंकला असून त्यांची स्थिती किंचित सुधारली आहे, पण काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत तब्बल 17 राज्यांमध्ये भोपळाही फोडता आला नाही. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मणिपूर, मिझोराम,

ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply