नागोठणे : प्रतिनिधी
शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित झाले असल्याचा विश्वास रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शहरातील अडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी अतुल झेंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी नागोठणे पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम थांबले आहे. येत्या पावसाळ्याच्या आगोदर नागोठणे पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत उभी राहील असा निर्वाळा झेडे यांनी यावेळी दिला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, नागोठण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर व विनोद पाटील उपस्थित होते. रायगडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अजय झेंडे यांनी नागोठणे शहरातील नुक्कड गल्ली व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील वाहतूकीसंदर्भात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना मार्गदर्शन केले. तसेच नागोठणे परिसरातील कंपन्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.