Breaking News

वंचित घटकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी सुनील गावस्करची आर्थिक मदत

पनवेल : वार्ताहर
समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियेसाठी क्रिकेटपटू सुनील गावस्कर संपूर्ण आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा आज पनवेल जवळील खारघर येथे श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केली.
या वेळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह श्री सत्य साई आरोग्य आणि शिक्षण ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवास, ट्रस्टी विवेेक गौर, अरविंद थियागाराजन आदींसह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितले की, या बालकांच्या हृदयास उपचाराची अतिशय आवश्यकता आहे. बाल हृदयविकार उपचार हे देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचले पाहिजे. भले ती मुले कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक स्तरातील पालकांची असोत. ही संस्था सदर लोकांसाठी प्रामाणिक काम करीत असून याचा मला अतिशय समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनाच्या वेळी बोलताना अध्यक्ष सी. श्रीनिवास यांनी सांगितले की, हे सेंटर म्हणजे श्री सत्य साईबाबांचा सामाजिक संदेश आणि त्यांचे दर्जेदार आरोग्य सेवेचे मॉडेल यांचे एक प्रतिक आहे. येथे रुग्णाला धर्म, जात, पंथ, राष्ट्रीयत्व आणि लिंग न पाहता त्याला संपूर्णपणे मोफत अशा आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. यावेळी प्राथमिक स्वरूपात मुलांची तपासणी करण्यात आली. या बालरोग हृदय शस्त्रक्रिया समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील मुलांच्या केल्या जाणार असून त्यासाठी पुढील काही महिन्यांचा अवधी त्यांच्या पालकांना देण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply