Breaking News

पेणमध्ये भाजपच्या संपर्क अभियानाला वाढता प्रतिसाद

पेण ः रामप्रहर वृत्तसंस्था

मोदी सरकारच्या काळातील यशस्वी योजनांची जनतेसमोर मांडणी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे मोदी सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी ऽ 9 या कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

पेण तालुक्यातील रावे, दादर, जोहे, भाल, विठ्ठल वाडी येथील महिलांचा या अभियानात मोठा सहभाग लाभत आहे. आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभियान यशस्वी होत आहे.

मोदी सरकारचे कार्य घरोघरी पोहचविण्यासाठी पेणमधील भाजप कार्यकर्ते पावसाची तमा न बाळगता कार्य करीत आहे. या अभियानात प्रामुख्याने भाजप नेत्या शर्मिला वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कौसल्या पाटील, वंदना म्हात्रे, स्नेहल सावंत, विजया पाटील, हमरापुर विभागातील महिला सहभागी झाल्या आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply