Breaking News

‘रयत’च्या नाशिक विंचूर येथील नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

नाशिक : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या नाशिकमधील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 17) झाले. या कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शरद पवार व अन्य मान्यवरांनी विचार मांडले. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, विनायक पाटील, राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, किशोर दराडे, रवींद्र पवार, श्रीराम शेटे, कोंडाजी आव्हाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, संजय बनकर, अमृता पवार, पंढरीनाथ थोरे, काकासाहेब गुंजाळ, जयदत्त होळकर, सरपंच कानडे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply