Breaking News

भाजप सदैव जनतेच्या पाठिशी; आमदार प्रशांत ठाकूर यांची जनसंवाद मेळाव्यात ग्वाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनतेच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी, नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. पनवेल तालुक्यातील वलप आणि कानपोली परिसरात असलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत भाजपच्या माध्यमातून जनसंवाद मेळाव्याचे आयोजन रविवारी (दि. 13) करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजप नेते एकनाथ देशेकर, वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, वलप अध्यक्ष प्रभाकर पाटील, बूथ अध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना पाटील, नवनाथ खुटारकर, संजोग पाटील, सम्राट पाटील, भरत पाटील, अंकुश पाटील, परेश पाटील, राजेश पाटील, प्रतीक पाटील, जगन्नाथ पाटील, स्वामी पाटील, प्रताप पाटील, मोतीराम पाटील, वसंत पाटील, अनिल पाटील, बाळकृष्ण पाटील, राजेश पाटील, उमेश पाटील यांच्यासह ग्रीनवूड फेज 1, फेज 2, कल्पवृक्ष, बालाजी रेसिडेन्सी, समृद्धी, श्री कॉम्प्लेक्समधील रहिवासी उपस्थित होते. कानपोली आणि वलप येथील सोसायट्यांमधील रहिवाशांना पाणी, बससेवा, घंटागाडी, स्मशानभूमी, शाळा आणि आरोग्यसेवा यांसारख्या समस्या भेडसावत असून त्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी हा जनसंवाद मेळावा घेण्यात आला. या वेळी उपस्थित रहिवाशांनी आपल्या समस्या मान्यवरांसमोर मांडल्या. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले, तर भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनीही रहिवाशांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply