पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवती यश मिळविले असून, 14 पैकी 9 ग्रापंचायतींवर झेंडा फडकावला. यातील वलप आणि पाटणोली येथील भाजपच्या विजयी सदस्यांनी बुधवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वलप येथील ज्योत्स्ना पाटील, तसेच पाटणोली येथून संजय पाटील, संगीता पाटील, अनिरुद्ध पाटील, विनंती पाटील, दिनेश पारधी, समाधान ठाकरे, मनीषा पारधी, गौरी कैवारी हे ग्रामपपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या सर्व विजयी उमेदवारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी नगरसेविका सीता पाटील, भाजप नेते सदानंद पाटील, नवनाथ खुटारकर, माजी उपसरपंच जे. के. पाटील, भाजप वलप अध्यक्ष पी. के. पाटील, दत्तात्रेय पाटील, संजोग पाटील, राजेश पाटील, समीर पाटील, सुभाष पाटील, प्रभाकर पाटील, वैभव पाटील, श्रावण पाटील, अंबाजी ठाकरे, हिरा पाटील, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper