Breaking News

चिंध्रणमध्ये शेतकर्‍यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप

देशेकर दाम्पत्याचा कौतुकास्पद उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने भाजपचे ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर व चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांनी चिंध्रणमध्ये शेतकर्‍यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप करण्यात आली. दीपक फर्टिलासर अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड संचलित ईशान्य फाउंडेशन पाले खुर्द यांच्या सहकार्याने व ज्ञानम कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. महिला आरोग्य जागृती कार्यक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कमला एकनाथ देशेकर, दीपक फर्टीलायझरच्या एव्हीपी जयश्री काटकर, सीएसआर मॅनेजर संदीप काकडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगा प्रशिक्षक डॉ. रीचा भार्गव यांनी महिलांच्या आरोग्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे त्याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सर्व महिलांना करून आपल्या दैनंदिन कामात योगा करून आपले आरोग्य निरोगी व सशक्त ठेवण्यासाठी योगाचा उपयोग आपण करू शकतो, असे सांगितले. बेलापूरच्या ज्योती कलश संस्थेच्या डायरेक्ट अमिता नील यांनी महिलांच्या आरोग्या संबंधित सॅनिटरी पॅडचा उपयोग व वापर कशा पद्धतीने करायचा आणि कोणत्या प्रकारचे पॅड वापरावे या संबंधित मार्गदर्शन करून पॅडमुळे होणारे फायदे तोटे आणि पेड डिस्पोजल करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी जयश्री काटकर यांनी योगाचे आपल्या दैनंदिन जीवनात आणि सेंटर पॅडचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींवर महिलांसोबत चर्चा केली. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पिठाची गिरणी, पेंटिंग साठी कॉम्प्रेसर आणि इलेक्ट्रिशन साहित्य संच चिंध्रण व पाले खुर्द येथील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महोदर कुत्तरपाडा चिंचवली महाळुंगी चिंध्रण, पाले खुर्द येथील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशान्य फाउंडेशनमार्फत योगेश पाटील यांनी केले. ज्योतिष शास्त्र  तज्ञ जयंत कुलकर्णी, हरीश सचदेव यांची उपस्थिती लाभली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply