पनवेल महापालिका आणि ‘माविम’ यांचा संयुक्त उपक्रम
पनवेल ः प्रतिनिधी
कौशल्य विकासातून महिला एक यशस्वी उद्योजिका म्हणून झेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या बचत गटाच्या कार्यक्रमात उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. पनवेल महापालिका डेएनयुएलएम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), युनाटेड वे, सक्षम फाउंडेशन, नवी मुंबई डेएनयुएलएम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना विविध व्यवसायांसाठी लागणार्या वस्तूंचे वाटप नुकतेच पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील, युनाटेड वे सक्षम फाउंडेशनचे संदेश पवार, पनवेल महापालिका डेएनयुएलम विभागाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ पवार, नवी मुंबई मुख्यालयातील व्यवस्थापक तुषार पवार उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी, छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून मोठी उद्योजिका होऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन केले. युनाटेड वेचे संदेश पवार यांनी महिलांनी आपली आर्थिक बाजू भक्कम करणे गरजेचे असल्याचे पटवून सांगितले. एकूण 94 महिलांना साहित्य वाटप करण्यात आले.