देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव सध्या खूपच गाजतेय. कारण ज्या ज्या वेळी संघर्षाचा प्रसंग उद्भवलाय त्या वेळी डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतासुद्धा भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक-2 मोहिमेत डोवाल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजित डोवाल हे 1968च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्या कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. 2005 साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. 2014 सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती. 1999 साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी 814 विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्या वेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1984 मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याचा पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल 33 वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे. 2014 पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी संघटनांच्या तळांना हवाई दलाच्या विमानांनी लक्ष्य केले असून या तळांवर सुमारे 21 मिनिटे बॉम्बचा वर्षाव सुरू होता, असे समजते. या कारवाईनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …