Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजता केला गेला. या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील हे होते. संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणाद्वारे स्वंतत्र चळवळीला उजाळा दिला. भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, दीपक शिंदे, निशा नायर, प्राचार्य रूपेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply