मुरूड : प्रतिनिधी : जागतिक पोषण आहार पंधरवड्यानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मुरूड लक्ष्मीखार येथे किशोरवयीन मुलींना वयात येताना होणार्या शारीरिक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका संजाली कुलकर्णी यांनी वयात येताना होणारे शारीरिक बदल व मासिक पाळीच्या काळातील घ्यावयाची काळजी, तसेच पूरक पोषण आहार याबद्दल या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका बायसा साकोरे, आयसीटीसी विभागातील सचिन जाधव, समीर धांदुरे, महालॅबच्या ऋतुजा डांगे, लक्ष्मीखार येथील अंगणवाडी सेविका आरती शेडगे, सोनाली तडकर यांच्यासह नांदगाव येथील नूतन नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या वेळी सुमारे 50 किशोरवयीन मुलींची मोफत रक्ततपासणी करण्यात आली.
Check Also
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक
पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …