Breaking News

पेण पानेड येथे एकाची हत्या; आरोपी अटकेत

पेण ः प्रतिनिधी

तालुक्यातील पानेड आदिवासी वाडीवर कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. पानेड येथील आदिवासी वाडीवर एका वीटभट्टीवर सोनी लाला पवार रा. कामार्ली व त्यांचे पती लाला गोपीनाथ पवार हे काम करतात. सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लाला पवार त्यांच्या मुलासह बाहेर झोपले असताना आरोपी कृष्णा सखाराम वाघमारे (वय 44) याने लाला पवार यांच्या डोक्यात वार करून ठार मारले. सोनी पवार यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अधिक चौकशीअंती आरोपी कृष्णा वाघमारे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच, आरोपी व फिर्यादी व्याही असून कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याची त्याने कबूल केले आहे. याबाबत पेण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply