Breaking News

कामगार दिनानिमित्त कर्मचारी मेळावा आणि कबड्डी स्पर्धा

अलिबाग : रामप्रहर वृत्त

1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगडची सर्वसाधारण सभा, कामगार मेळावा आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय अलिबाग येथे कामगार दिनानिमित्त कामगार-कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते वि. ह. तेंडुलकर यांनी कामगार दिनाचा पूर्वेतिहास आणि आजची कामगार-कर्मचारी यांची सध्यस्थिती यावर मार्गदर्शन केले. सायंकाळी जिल्ह्यांतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सुधीर गजानन म्हात्रे सेवानिवृत्त वनपाल पुरस्कृत म्हसळा संघ आणि रोहा तालुका संघ, तसेच राजेंद्र खाडे पुरस्कृत माणगाव संघ  आणि अलिबाग तालुका संघ यांची लढत झाली. कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना म्हसळा तालुका संघ आणि अलिबाग तालुका संघ यांच्यात होऊन म्हसळा तालुक्यातील सरकारी कर्मचारी संघाने अव्वल स्थान पटकावले.

स्पर्धेत उत्कृष्ट चढाईचे बक्षीस म्हसळा संघाचा कर्णधार शशिकांत चेवले यांनी पटकाविले, तर उत्कृष्ट पकडचे बक्षीस अलिबाग संघाचा कर्णधार सचिन पाटील यांनी पटकावले. कबड्डी स्पर्धेचे पंच म्हणून संजय पोईलकर, रणजित तुणतुणे, लवेश थळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनाकरिता गौरेश म्हात्रे, संजय शिंगे, किरण जुईकर, प्रफुल्ल कानिटकर यांनी विशेष प्रयत्न केले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस तानाजी भोसले यांनी पुरस्कृत केले होते.

या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य प्रतिनिधी विलास तेंडुलकर, रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष बी. डी. हारपुडे, कोषाध्यक्ष श्रीमती दर्शना पाटील, रत्नाकर देसाई, प्रफुल्ल कानिटकर, म्हसळा तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, माणगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे, अलिबाग तालुका अध्यक्ष प्रणाली म्हात्रे, दर्शना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply