Breaking News

पनवेल परिसरातून तीन दुचाकींची चोरी

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे. भगवान भगत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल (एमएच 06 क्यू 1494) ही गार्डन हॉटेलसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेली आहे. तर दुसर्‍या घटनेत नूतन पाटील यांची 20 हजार रुपये किमतीची तपकीरी रंगाची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच 46 बीएच 8632) ही के मॉलजवळील इंडस बँकेच्या एटीएमसमोरून चोरून नेण्यात आली आहे. तर तिसर्‍या घटनेत प्रसाद भगत यांची 30 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची काळी मोटरसायकल (एमएच 46 एएन 9398) ही गुरुकृपा बिल्डींग सावरकर चौक येथील बिल्डिंगखाली उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरली. या बाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply