समस्या जाणून घेत नागरिकांशी साधला संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तसेच येत्या काळात होणार्या कामांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 21) पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला तसेच कामांसंदर्भात महापालिकेच्या अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरी कामे मार्गी लागत आहेत. त्या अनुषंगाने देवीचापाडा, ढोंगर्याचा पाडा, पेंधर, रोडपाली या गावातील रस्ते, गटारे, समाजमंदिराच्या कामांची तसेच स्मशानभूमीची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे ओवे गावात पाणी तुंबण्याच्या समस्येवर नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतली. या वेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना सूचना केल्या. या पाहणी दौर्यात माजी नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, संतोष भोईर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, पडघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, खारघर तळोजा मंडल अध्यक्ष विनोद घरत, भाजप नेते अशोक साळुंखे, विजय म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, सुरज फडके, हरीशेठ फडके, ज्ञानेश्वर डोंगरे, लहूशेठ डोंगरे, सुरेश डोंगरे, नितीन पाटील भगवान कोपरकर, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.