पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापान शिक्षण विभागातर्फे रिझ्युम बिल्डींग या विषयावर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक आरती कारवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. या व्याख्यानामध्ये रिझ्युम म्हणजे काय? रिझ्युम कसा तयार करावा? तसेच रिझ्युम तयार करण्याचा उद्देश समजून सांगण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी, उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अंकिता जांगिड यांनी केले. प्रा. रित थुळे यांनी प्रमुख वक्त्या प्रशिक्षक आरती कारवाडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पद्मप्रिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच प्रा.मीरा पटेल आणि प्रा. प्रविण सावे यांनी सहकार्य केले.
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी कौतुक केले.