तुझ्या डोक्यावरील केसांपेक्षा माझ्याकडे अधिक पैसे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंवर टीका केली आहे. या वेळी शोएबने पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये त्रिशतक करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागवर आरोप केला की त्याला यश पचवता आले नाही. मी चार बातम्यांमुळे प्रसिद्ध झालो नाही. 15 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर नाव कमावले आहे. राहता राहिला सेहवागचा प्रश्न, तर त्याच्या डोक्यावर जितके केस आहेत, त्यापेक्षा अधिक पैसे माझ्याकडे आहेत, असे शोएब बरळला.
एका व्हिडीओत सेहवाग म्हणाला होता की, शोएब पैसे कमावण्यासाठी भारताचे कौतुक करतो. त्यावर शोएब म्हणाला की, सेहवाग कधीच गंभीरपणे बोलत नाही. त्याने ते वाक्य विनोदाने आणि मजेत म्हटले होते, पण सेहवागला हे माहिती असेल की, भारतात माझे चाहते आहेत. मी बांगलादेशमध्ये जातो तेव्हा मला पाहण्यासाठी वाहतूक थांबते. ऑस्ट्रेलियात मी 10 सेकंदही एकटा राहू शकत नाही. त्यामुळेच मी सेहवागला सांगतो की, तुझ्या डोक्यावर जितके केस नाहीत, त्याहून अधिक पैसे माझ्याकडे आहेत, अशी मुक्ताफ ळे शोएब अख्तरने उधळली.