Sunday , June 4 2023
Breaking News

विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित, भाजप युवा नेते महेश कडू यांचा विश्वास

उरण : प्रतिनिधी

सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना एकवटली असून, मागील सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू यांनी व्यक्त केला आहे. श्री. कडू पुढे म्हणाले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनीही सोनारी गावाच्या विकासात भरघोस अशी भर घातली आहे. सोनारी गावाजवळील मैदानात होणारे पोलीस ठाणे रद्द करून मैदान गावासाठी कायम ठेवण्यात यश मिळविले. गावात आठ दिवसाआड एकदा पाणी मिळत असल्याने येथील महिला व गावकरी पाणीटंचाईच्या चिंतेत ग्रासले होते आणि जेएनपीटीनेही सोनारी ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर रखडवून ठेवल्याने व ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचा फंड उपलब्ध नसताना आम्ही ग्रामपंचायतीला सुमारे 10 लाखाचा निधी स्वतः देऊन गावासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. ग्रामपंचायतीकडे एमआयडीसीची थकीत असलेली पाणीपट्टी माफ करण्याचे काम केले आहे. गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी स्वखर्चातून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे मालाचे कार्यही केले. अन्य लहान- मोठी कामे करण्यातही तत्परता दाखविली. अशाप्रकारे भरघोस विकासकामांच्या जोरावर 24 फेब्रुवारी 2019 रोजी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महेश कडू यांच्यासह तीनही प्रभागांतील सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा शेवटी महेश कडू यांनी केला आहे.

Check Also

पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली …

Leave a Reply