पनवेल ः रामप्रहर वृत्त
कांडपिळे गु्रपच्या वतीने पनवेलजवळील सुकापूर येथे नव्याने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. अजय कांडपिळे आणि गौरव कांडपिळे यांच्या या या पेट्रोल पंपाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 24) उद्घाटन झाले. पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, ड प्रभाग समिती सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री विवेकर, सुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, अजय कांडपिळे, गौरव कांडपिळे, अजिंक्य कांडपिळे, अॅड. श्रद्धा कांडपिळे, डॉ. श्रद्धा कांडपिळे, वैभव देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कांडपिळे कुटूंबातील सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कांडपिळे परिवाराचा व्यवसायाचा वारसा ही पिढी यशस्वीपणे पुढे नेत आहे, असे प्रतिपादन केले आणि त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.