पनवेल : रामप्रहर वृत्त
विकासकामाच्या मूल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेणारा उसर्ली गु्रप ग्रामपंचायतीचा शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच अतुल आनंद तांबे याला बुधवारी (दि. 2) रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे उसर्ली खुर्द परिसरासह पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेकापचा सरपंच अतुल तांबे याने कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदाराकडे पनवेल तालुक्यातील डेरवली येथील मातोश्री सोसायटीसमोरील रस्ता तसेच डेरवली बसथांबा ते साईनिकेतनपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या विकासकामाच्या मूल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
आलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विचुंबे, नवीन पनवेल येथे सापळा रचून तडजोडीअंती ठरलेली 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेकाप सरपंच अतुल तांबे याला बुधवारी 2च्या सुमारास रंगेहाथ पकडले व ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …