Breaking News

राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री एक ‘मातोश्री’वर आणि दुसरे महाराष्ट्रभर फिरत आहेत

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दै. सामनाला विशेष मुलाखत दिली. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दुसर्‍या वाहिनीला मुलाखत देऊन दाखवाच, असे म्हणत पलटवार केला आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री असल्याचे म्हणत त्यांनी टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक म्हणजे जे ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत आणि दुसरे म्हणजे जे राज्यभर फिरत आहेत असे म्हणत पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सातवीच्या मुलालाही निबंध लिहायला सांगितला तर तो लिहिल. केवळ कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही असे ते म्हणतात, परंतु तिघेही भांडत असतात आणि नंतर काहीही झाले नाही असे म्हणतात, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली. कोंबडं झाकून ठेवलं तरी तरी सूर्य उगवायचा राहत नाही. मुख्यमंत्र्यांनी कटूपणा सोडत विरोधी आमदारांशी बोलावं आणि पुण्याचीदेखील चिंता केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई : ‘सामना’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून मनसेने हल्लाबोल केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, कोणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉकडाऊन काढता येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. याच्याशी 100 मी सहमत आहे, परंतु कोणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही, असे महाराष्ट्राची जनता म्हणत असल्याचे म्हणत ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply