पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 9)करण्यात आले होते. हा सोहळा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा गुणगौरव केला.
या समारंभाला परीक्षा विभागाचे चेअरमन डॉ. अशोक आढाव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …