पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीन विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे एक कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बुधवारी (दि. 25) झाला. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या माध्यमातून 20 लाख रुपयांच्या निधीमधून ग्रामपंचायत भिंगार शेडूंग गावात हनुमान मंदिर ते रामदास खेत्री यांच्या घरापर्यंत गटार व रस्ता काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीमधून शेडूंग गावात अंतर्गत रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भेरले अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भेरले येथे सभामंडपाला शेड बांधणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भेरले गावात अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भिंगार अंतर्गत रस्ता व गटार करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून भिंगार गावात अंतर्गत रस्ता तयार करणे, आठ लाख रुपयांच्या निधीमधून भिंगार येथे गटार व रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून वारदोली अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाख रुपयांच्या निधीमधून सांगडे गावात अंतर्गत रस्ता तयार करणे, लोणीवली गावात 10 लाख रुपयांच्या 25/15 निधीमधून गणपत मालुसरे ते सुभाष पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, भिंगारचे सरपंच सुभाष रामदास वाघमारे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, सदस्य सुनील पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …