रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा येथील समुद्रात अवैधरित्या डिझेल विक्री करणार्या इंजिन बोटीवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकला आणि चौघांना अटक केली आहे. रेवदंडा रेती बंदरनजीक एक इंजिन बोट समुद्रातील अन्य बोटींना अवैधरित्या डिझेल विक्री करीत असल्याची खबर लागल्यावर खोपोली ठाणे निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. या वेळी एका बोटीत बेकायदेशीररित्या साठा केलेले अंदाजे दोन लाख सात हजार रुपये किमतीचे 2250 लिटर डिझेल हस्तगत केले. या वेळी पोलिसांनी एकूण 17 लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. या वेळी बोटीवरील तांडेल परशुराम सदाशिव कोळी (वय 49), मारुती दामोदर कोळी (वय 53), यज्ञेश रामा कोळी (वय 33, सर्व रा. रेवस गाव) आणि विनायक तुळशीराम कोळी (वय 38, रा. बोडणी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper