पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य परेश ठाकूर याने आपल्या नवव्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकमध्ये जमा झालेले 2470 रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत जमा केले. याद्वारे त्याने सामाजिक बांधलकीचा कौटुंबिक वारसा लहानवयातच जोपासला आहे. त्याबद्दल सर्वस्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
आदित्य हा दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नातू आणि सभागृह नेते परेश ठाकूर व सामाजिक क्षेत्रातील वीर वूमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांचा चिरंजीव आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर समाजाची अविरतपणे सेवा करीत असतात. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदित्यने लहानपणीच प्रगल्भता दाखविली आहे.
कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पनवेल महापालिकेसह संपूर्ण तालुका रेड झोनमध्ये समाविष्ट असून, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड योद्धे प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी महापौर सहाय्यता निधीत रक्कम जमा करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला असून, आदित्य ठाकूर याने वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करता लहान वयातच समाजासमोर एक चांगले उदाहरण ठेवले. म्हणून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper