Breaking News

माणगावात एसटी चालकास मारहाण

माणगाव : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगांव येथील एकत पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5.50वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन- मुंबई एसटी बस चालकास हाताबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एसटी बस चालक आदित्य मोहन शिंदे (वय 31, रा. महेश्वर आळी, ता. श्रीवर्धन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणार्‍यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   चालक आदित्य शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी एसटी बस (एम.एच. 06, बी. डब्ल्यू 0490) घेवून श्रीवर्धन ते मुंबई जात होते. त्यांची गाडी माणगाव जवळील एकता पेट्रोल पंपाजवळ आली असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांची टाटा एस गाडी (एम.एच.06, बी.जी.3581) एसटीच्या आडवी घालून त्यांनी चालकाला हाताबुक्याने बेदम मारुन जखमी केले.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply