Breaking News

गुरे चोरून नेणार्‍या गाडीला अपघात

दोन गुरांची सुटका;नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

दोन गायींना पळवून नेणार्‍या जीपला कर्जत तालुक्यातील बाटलीचीवाडी येथे अपघात झाला. गुरांना बेशुद्ध करून चोरून नेणार्‍या गाडीचा चालक आणि अन्य एकाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भिवंडी तालुक्यातील कोन गावातील बळवंत सुळे यांच्या मालकीची टाटा कंपनीची जीप (एमएच-43, व्ही-5593) कर्जत-मुरबाड रस्त्यावरील बाटलीचीवाडी येथे 28 मार्च रोजी अपघात झाला. त्याचे वृत्त समजताच बाटलीची वाडी येथील आदिवासी ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांना अपघातग्रस्त जीपमध्ये दोन गायी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. ही माहिती ग्रामस्थांनी नेरळ पोलिसांना दिली. पोलिसांनाही त्या जीपमध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोन गायी आणि जनावरे बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शन सापडली.जीप चालक आणि वाहक यांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply