Breaking News

जयहिन्द कप क्रिकेट स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरच्या जयहिन्द क्रीडा मंडळाच्या वतीने व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खारघर शहर मंडळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जयहिन्द कप 2020 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष ब्रिजेश पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, नगरसेवक नीलेश बावीस्कर, संतोष शर्मा, समीर कदम, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा खडगी, सचिव मकरंद पाटील, दीपक शिंदे, गीता चौधरी आणि खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 14 वर्षाखालील सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा (इंटर स्कूल आणि क्लब) रविवार (दि. 26)पर्यंत खारघरच्या सेक्टर 19मध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या ग्राऊंडवर आयोजित केलेल्या आहे.  या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक करुन क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply