Breaking News

खैरवाडीच्या सरपंचपदी भाजपच्या मंदा वारगडा

पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 30) झाली. या निवडणुकीत भाजपच्या मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच मंदा वारगडा यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, संतोष पाटील, शत्रृघ्न उसाटकर, दिनेश फडके, एकनाथ नाईक, गोमा दुमणे, पांडुरंग भगत, रामदास शिंदे, रमेश झुगरे, बुधाजी खैरे, माजी सरपंच रंजना दुमणे, नामदेव जमदाडे, उपसरपंच हनुमान खैरे, लक्ष्मण शिद, सदस्य करुणा भगत, भाग्यश्री कोळंबेकर, अंकेश पांडव, नरेश पाटील, संतोष पाटील, रवींद्र पाटील, भगवान कडू,  मंगल्या पारधी, जनार्दन कोळंबेकर, पिंटु म्हात्रे, रमेश म्हपळकर, मारुती पाटील, शांताराम चौधरी, शामदास शिंदे, मंगल्या झुगरे, धर्मा वारगडा, धमाजी शिंदे, हिरामण खैरे, सिताराम वारगडा, काळुराम थोराड, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
एकनाथ देशेकर यांनी नवनिर्वाचित सरपंचांना पुढील वाटचाली करीत शुभेच्छा देत ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे, असे प्रतिपादन केले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply