पाली : प्रतिनिधी
हेलिकॉप्टरपद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (दि.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पुर्ण करता येणार आहे.
वरद हेलिकॉप्टर सर्विसेसचे हे हेलिकॉप्टर आहे. ओझर येथून सकाळी 8:46 ला या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत या पाच प्रवाशी भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी 1:45 वाजता पालीत पोहचले. इथे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धंनजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त राहुल मराठे, सचिन साठे व माधव साने यांच्यासह शेखर सोमण व देवस्थान कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. मांडे यांनी येथील हेलिपॅड व व्यवस्थापनाचे कौतुक केले तसेच 14 जणांनी या हेलिकॉप्टर दर्शन सेवेसाठी आगाऊ बुकिंग केले असून अनेक जण विचारणा करत आहेत असे मांडे यांनी सांगितले.
या सुविधा मिळणार
देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शन व्यवस्था अभिषेक, सत्कार व अल्पोपहार व्यवस्था. हेलिपॅड ते मंदिरापर्यंत वाहनाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने केली जाईल. प्रवासी भाविकांना राहत्या शहरातुन प्रवास सुविधा उपलब्ध.
प्रवास करताना पाळावयाचे नियम व अटी
हेलिकॉप्टर प्रवासाची आसनक्षमता सहा व्यक्तींची आहे. प्रवास करते वेळी आरोग्य तपासणी केली जाईल. अष्टविनायक दर्शनासाठी प्रवासाची संपूर्ण रक्कम अदा करावी लागेल. राहत्या शहरापासून हेलिपॅडपर्यंतचा वाहनाचा प्रवास खर्च आकारला जाईल.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …