Breaking News

खारघरमध्ये फिटनेस आणि डान्स स्टुडिओचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर सेक्टर 6 येथे उभारण्यात आलेल्या आर्क 909 या फिटनेस आणि डान्स स्टुडिओचे उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जयप्रकाश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना भाजप नेते राम नाईक यांनी खारघरसारख्या मोठ्या शहरात आपण फिटनेस आणि डान्सचे धडे उत्तमरित्या द्याल आणि खारघरमधूनच नव्हे तर पनवेल, कामोठे, कळंबोलीसह नवी मुंबईतूनही आपल्याकडे फिटनेस आणि डान्सच्या प्रशिक्षणासाठी लोक मोठ्या संख्येने येतील, असा आशावाद व्यक्त केला.

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनीही श्वेता मेढेकर आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेरा, भाजप खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, समीर कदम, गीता चौधरी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply