Breaking News

सहारा फार्म आणि रिसोर्टचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील वावंजे येथे उभारण्यात आलेल्या सहारा फार्म आणि रेस्टॉरंटचे उद्घाटन शनिवारी (दि. 2) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रल्हाद केणी, उपाध्यक्ष वासुदेव घरत, एकनाथ देशेकर, निर्दोष केणी, प्रभाकर जोशी, विनोद घरत, गजानन घरत, साजिद पटेल, राजू घरत आदी मान्यवर उपस्थित होते. महेंद्र कृष्णा घरत यांनी नव्याने सुरू केलेल्या या व्यवसायाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनानंतर भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कार्यक्रमस्थळी भेट घेतली. या वेळी भाजप उपाध्यक्ष वासुदेव घरत, खारघर शहर अध्यक्ष विनोद घरत, माजी सरपंच महेंद्र घरत, भाजप युवा नेते शुभ पाटील, राजेंद्र घरत आदी उपस्थित होते.

सहारा फार्म आणि रिसोर्टमध्ये वाढदिवस समारंभ, लग्न समारंभ, इव्हेंट, पार्टी इत्यादी कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतात. या फार्मची युट्यूब लिंक ीरहरीरषरीा।ीशीेीीं आहे. सहारा फार्म बावंजे (निताले) खानाचा बंगला येथे आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply