मुंबई ः प्रतिनिधी
पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाखपेक्षा अधिक शेतकर्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील 24 तासांत सात लाख 20 हजार शेतकर्यांनी विमा अर्ज भरला आहे, मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये या दृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकर्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री मुंडे यांनी केले आहे.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …