Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सोमवारी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पनवेल ः प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांची उपस्थिती लाभणार असून जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply