Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिल्या वीजेसंदर्भात महावितरण अभियंत्यांना सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिकांना कमीत कमी अनामत रक्कम भरून वीज देण्याची सूचना महावितरणच्या अभियंत्यांना केली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या झोपडपट्टी वसाहतीमधील भेटीनंतर पनवेल शहरातील नवनाथ नगर, मालधक्का झोपडपट्टी वसाहतीमधील विजेची समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी सूचना प्रभागातील नेत्यांना देण्यात आली होती.

या बाबत सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी सतत नवनाथ नगर रहिवासी महावितरणच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करून बैठकीमध्ये हा विषय घेतला होता. या समस्येबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडेदेखील चर्चा नवनाथनगर झोपडपट्टीचे अध्यक्ष अब्दूल आलम, उपाध्यक्ष रवी गरड यांनी केला होता.

विजेच्या समस्यांबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, इंजिनिअर आणि कार्यकारी अभियंता श्री. बोके यांना महानगरपालिकेच्या सभागृहात बोलावून सविस्तर माहिती घेऊन याबाबत ज्या रहिवाशी नागरिकांनी वीज बील भरला आहे किंवा त्यांनी थकबाकी भरली आहे. त्यांना कमीतकमी अनामत रक्कम 1000 रुपये भरून नवीन वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी सूचना केली. यावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कार्यकारी अभियंता बोके यांनी मान्य केले आहे.

या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप नेते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, मालधक्का झोपडपट्टी अध्यक्ष अब्दुल आलंम, उपाध्यक्ष रवी गरड, महाराष्ट्र विद्युत पनवेल  विभागाचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री. सरोदे, श्री. बोके, महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. जगताप, श्री. कटेकर या वेळी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply