Breaking News

सुसज्ज रमाधाम लवकरच सेवेत रुजू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास; आजी-आजोबांची घेतली भेट

खालापूर ः प्रतिनिधी

खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमाचे रुपटे बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुसज्ज रमाधाम लवकरच आजी-आजोबांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. बुधवारी (दि. 12) उशिरा उद्धव ठाकरे खोपोलीच्या रमाधाममध्ये दाखल होत नव्याने उभारण्यात येणार्‍या तीन मजली इमारतीचे, बगिच्या व गार्डनमधील झाडांचे तसेच नव्याने सुधारणा करण्यात येत असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. 

उद्धव ठाकरे यांना आईभवानी चांगले आरोग्यसंपन्न आयुष्य देवो. त्यांच्या हातून चांगले काम होत आहे. शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. त्यामध्ये अजून भरभराट होवो, असे आशीर्वाद खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमातील वृद्धांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले. सर्वच वृद्धांनी उद्धव ठाकरे यांचे उभे राहून पुष्पगुच्छ देत लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्याबद्दल अभिनंदन केले, तर त्या वृद्धांसमोर नतमस्तक होत चरणस्पर्श करीत उद्धव ठाकरे यांनी आशीर्वाद घेतले. युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रमाधाममधील आजी-आजोबांनी उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा पोहोच करण्याचा संदेश दिला. तुमच्या शुभेच्छांचा संदेश आदित्य यांना जाऊन देईन, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी नव्याने रमाधाम साकारण्यात येत असताना त्या कामाची पाहणी करून लवकरच नवीन वास्तू आपल्या सेवेत येईल, अशी ग्वाहीही दिली.

या वेळी उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई, रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, अभिनेते मिलिंद गुणाजी, रामनाथकर, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पुणे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, स्थानीय लोकाधिकार समितीचे वामन भोसले, उल्हास बिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply