Breaking News

वालासह कडधान्यांचे भाव वधारले

सुधागड : रामप्रहर वृत्त
अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील प्रसिद्ध गावठी वालाचे दरही किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत.
रायगड जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मूग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली जाते. ग्राहकांकडून गोड व कडवे वाल, लहान चवळी आणि निडीच्या वालांना अधिक पसंती असते. पावसाळ्यासाठी खेड्यापाड्यासह शहरातील अनेक जण या कडधान्याची खरेदी करतात. त्यात गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. बाजारात किरकोळ व घाऊक दरात कडधान्य उपलब्ध आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कडधान्य पिकांचे खूप नुकसान झाले. परिणामी यंदा वालाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले आहेत.

सध्या बाजारात ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने या वर्षी कडधान्यांचे भाव वाढले आहेत.
-भद्रेश शहा, कडधान्य विक्रेते,

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी आम्ही गावठी कडधान्य विकत घेतो. यंदा भाव जास्त आहेत. शहरातील नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून कडधान्ये पाठवितो.
-लता माळी, गृहिणी, पाली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply