मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर
कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत उपचार करणार्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेलमधील खांदा वसाहत येथील शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 17) रोजी सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, डॉ. गिरीश गुणे, डॉ. देवेंद्र पाल आणि डॉ. प्रितम कळसकर,डॉ. अक्षय शिवचंद, डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. सोनल दांडे, डॉ. मंगेश मेखा, डॉ. रितू दवे, डॉ. स्मित शेठ, डॉ. उदीप माहेश्वरी, डॉ. सीमा जागियासी, डॉ. दर्शना राणे, डॉ. आशिष जोशी, डॉ. क्षितीज जोशी, डॉ. वाषिशेठ मणियार, डॉ. प्रदीप किंद्रे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ही कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणारी डे-केअर साखळीस्वरुप संस्था आहे. मुंबई व महाराष्ट्रात 8 सेंटर्स सध्या कार्यरत असून गेली 4 वर्ष कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांमार्फत, सर्व आधूनिक सुविधांनी सज्ज अशा डे केअर सेंटर्समध्ये, वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.