Breaking News

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या नेतृत्वाखाली भिमोत्सव उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आपल्या भारत देशाला अधिक बलवान बनवायचे असेल तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळ धारदार बनवून देशात समता, बंधुत्व, न्याय व विज्ञानाचा पुरस्कार करणे हे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पुर्णपणे पार पाडण्यासाठी अनुयायांनी झटले पाहिजे, असे प्रतिपादन प्रवचनकार कल्पेश कांबळे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय जनता पक्ष, अनुसूचित जाती मोर्चा यांच्या विद्यमाने 14 ते 16 एप्रिलदरम्यान  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती नवीन पनवेल येथे भव्य स्वरुपात उत्साहाने साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी होते. या वेळी अपेक्षा बिनेदार, प्रमिला वानखेडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. भिमजयंती महोत्सवाचे आयोजक नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनीही मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या भिमजयंती महोत्सवाच्या संध्याकाळच्या सत्र कार्यक्रमात गायक एकनाथ माळी व गायिका रेश्मा सोनावणे यांचा भिमगीतांचा बहारदार सामना ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश जाधव होते. दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचाही भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वाती बिनेदार होत्या. तिसर्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक माता-पितांचा हृद्यसत्कार करण्यात आला तसेच गायक प्रकाश सावंत यांचा वाद्यवृंदनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या भिम जयंती महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका वृषाली वाघमारे, नगरसेविका राजश्री वावेकर, नगरसेविका सुशिला घरत यांच्यासह  अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply