Breaking News

पनवेलमध्ये सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिसानमित्त उपक्रम

पनवेल ः वार्ताहर

रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 22) सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.

शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही घेण्यात आला.

या वेळी नगरसेवक नितीन पाटील, ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका निता माळी, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, ओबीसी मोर्चा पनवेल शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, सूर्यकांत पंडित, सपना पाटील, श्वेता म्हात्रे, स्नेहा पंडित, निता मंजुळे, सनी बागडी, कविता पाटील, कल्पिता खेडेकर, चेतन वाघ, विकी कागडा, ऋषिकेश घेरडे, प्रीती आरे, मनीषा वाघ, मेनिया रिडो यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply