Breaking News

उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळा

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील उरण नागरिषद हद्दीतील श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी-पाखाडी) यांच्या वतीने उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा (दिंडी) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 10) या सोहळ्याला सकाळी 6 वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी-पखाडी) येथून सुरुवात झाली.

वैष्णवी हॉटेल, स्वामी विवेकानंद चौक, देऊळवाडी (शंकर मंदिर), गणपती चौक, राजपाल नाका, कोट नाका, राघोबा देव मंदिर येथे अल्पोपहार करून पुढे श्री क्षेत्र शिर्डीसाठी दिंडी  प्रस्थान केले. ठिक-ठिकाणी साई भक्तांनी साई पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी येथे प्रस्थान झाले.

या पालखीमध्ये धनंजय भोरे, दीपक थळी, सुरेश अय्यर (अण्णा) हरिराम शर्मा, सुयोग ठाकूर, राजेश पुरव, सिद्धार्थ म्हात्रे, सिद्धार्थ सुर्वे, रोहन पारधी, हंसराज चव्हाण, प्रशांत शिरधनकर, प्रलय तारेकर, ओमकार राऊत मयुरेश पाटील, विशाल जाधव, भूषण पाटील, मयुरेश सदशियन, चेतन माळी, गणेश तांडेल, जयेश म्हात्रे, राहुल सोलंकी व सर्व पदाधिकारी, सभासद, साई भक्त आदींचे सहकार्य मिळाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply