Breaking News

हिंद टर्मिनल लॉजिस्टिकच्या 600 कामगारांचा प्रश्न मार्गी

आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत दिल्लीत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सीडब्ल्यूसी हिंद टर्मिनल कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू नका, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सीडब्ल्यूसी लॉजीस्टिक पार्क (हिंद टर्मिनल)चे डायरेक्टर अमित कुमार यांना दिले आहेत. हिंद टर्मिनल लॉजीस्टिकमधील 600 कर्मचार्‍यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने दिल्ली येथे गुरुवारी (दि. 21) बैठक पार पडली.

उरण तालुक्यातील भेंडखळ येथे असलेल्या सीडब्ल्यूसी लॉजीस्टिक पार्क (हिंद टर्मिनल) मधील कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, सीडब्ल्यूसी लॉजीस्टिक पार्क (हिंद टर्मिनल)चे डायरेक्टर अमित कुमार यांची बैठक घडवून देत 600 कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे आमदार महेश बालदी यांनी अधोरेखित केले. एवढ्या कामगारांच्या रोजी रोटीचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होईल हा विषय आमदार महेश बालदी यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

या वेळी झालेल्या चर्चेनुसार कंपनीचे व्यवस्थापक यांना नामदार पियुष गोयल यांनी कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी बंद पडून देऊ नका आणि या कामगारांवर उपासमारीची वेळ देऊ नका, अशी सूचना वजा निर्देश दिले.

या बैठकीला मिलिंद पाटील, कृष्णा ठाकूर, लंकेश ठाकूर, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे झालेली ही बैठक कामगारांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक झाली, त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. या कामगारांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply