Breaking News

पनवेल तालुका पोलीस पथकाकडून रूट मार्च

पनवेल ः वार्ताहर

महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी वावंजे येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली.

पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वावंजे याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार तसेच तळोजा एमआयडीसीकडील अग्निशमन दलाचे एक अधिकारी, पाच फायरमॅन टेंडर व्हेन व अ‍ॅम्ब्युलन्स सहभागी झाले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply