Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरघोस मतदान

मुरुड तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 24) शांततेत मतदान झाले. त्यापैकी आंबोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाले.  आंबोलीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या वेळी येथे शिवसेना विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे. आंबोलीमध्ये एकूण 2540पैकी 1930 मतदारांनी मतदान केलेे. तेथे 75.98 टक्के मतदान झाले आहे.मजगाव ग्रामपंचायतीमध्ये 70.73 टक्के मतदान झाले. तेथे 2473 मतदारांनी  मतदान केलेे. उसरोली ग्रामपंचायतीमध्ये  4084पैकी 3086 मतदारांनी आपला हक्क बजावला. येथे नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समीर शिंदे यांनी मतदारांना कौल लावला आहे. येथे भाजप विरुध्द राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. सोमवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता तहसीलदार  कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

पाटणसई आणि शिहू ग्रा. पं. निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान

नागोठणे : प्रतिनिधी

विभागात रोहे तालुक्यातील पाटणसई आणि पेण तालुक्यातील शिहू या सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (दि. 24) शांततेत पार पडले. पाटणसई ग्रा. पं. निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकाप -शिवसेना आघाडीच्या माधवी गायकर आणि काँग्रेसच्या जनविकास महाआघाडीच्या पल्लवी देवरे यांच्यात सरळ लढत होत आहे. पाटणसईत 5 मतदान केंद्रांत एकूण 2152 मतदार असून दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी 62 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिहू ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रे आहेत. एकूण मतदारांची संख्या 3961 इतकी आहे व दुपारपर्यंत 56 टक्के मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस- भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या कृष्णी म्हात्रे विरुद्ध शेकापच्या पल्लवी भोईर यांच्यात सरळ लढत होत आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मतदान शांततेत पार पडले असल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply