मुंबई ः प्रतिनिधी
यंदा लहरी हवामानामुळे आणि आंब्यावर आलेल्या रोगामुळे सर्वच ठिकाणांच्या आंब्याचे पीक 50 टक्के घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा कमी आला. त्यात यावर्षीचा हंगामही लवकरच संपणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
हापूस आंब्याचा हंगाम हा व्यापार्यांसाठी मोठा आणि महत्त्वाचा असतो. या हंगामात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने व्यापारी आतुरतेने आंब्याच्या हंगामाची वाट पाहत असतात, मात्र यावर्षी बाजारात आंबा कमी आला. त्यातही सुमार दर्जाचा आंबा अधिक आल्यामुळे व्यापार्यांसह आंबा खवय्यांचीही निराशा झाली, तसेच सध्या आवक स्थिर असून, यापेक्षा अधिक आवक होणार नसल्याचे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर 20 मेपर्यंतच चांगल्या दर्जाचा हापूस आंबा बाजारात पाहायला मिळेल. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे.